व्हिडीओ; कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या तळघरात अब्जावधींचा खजिना

mahalaxmi
देवीच्या एका रहस्यमय मंदिराची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत. विज्ञानाकडे देखील या रहस्याचे उत्तर नाही. आजपर्यंत कोणीही कोल्हापुरात असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरातील खांबांची मोजदाद करु शकलेले नाही.

काही जण मंदिरात अब्जावधीचा खजाना लपविण्यात आल्याचेही सांगतात. ३ वर्षांपूर्वी हा खजाना उघडण्यात आला होता. सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने तेव्हा यात असल्याचे समोर आले होते. अब्जावधी रुपये याचे बाजारमूल्य आहे. सोन्याची मोठी गदा, सोन्याच्या नाण्याचा हार, सोन्याची साखळी, चांदीची तलवार, महालक्ष्मीचा सुवर्ण मुकुट, श्रीयंत्र हार, सोन्याचे घुंघरू आणि हिऱ्याचे हार, मुगल, आदिलशाही आणि पेशवाईच्या काळातील दागिण्यांचाखजान्यात समावेश आहे.

(व्हिडीओ सौजन्य – BB News)
याबाबत इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, कोकणातील राजांनी, चालुक्यकालीन राजांनी, आदिलशाही, शिवाजी महाराज, जिजामाता यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दान केले आहे. मंदिरात १० दिवस कडक सुरक्षा व्यवस्थेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली खजिन्याची मोजदाद करण्यात येते. खजिन्याची मोजदाद करण्यात आल्यानंतर आता दागिण्यांचा विमा काढण्यात आला आहे. १९६२ मध्ये यापूर्वी मंदिराचा खजाना उघडण्यात आला होता.

मंदिराबाहेर असणाऱ्या शिलालेखावरुन लक्षात येते की हे मंदिर १८०० वर्ष जुने आहे. राजा कर्णदेवाने शालिवाहन काळात याची उभारणी केली. काळातराने तेथे अजुन ३० ते ३५ मंदिरे बांधण्यात आली. २७ हजार वर्गफूट क्षेत्रफळावर पसरलेले हे मंदिर ५१ शक्तीपिठांपैकी एक आहे. महालक्ष्मीच्या या मुर्तीची प्राण-प्रतिष्ठा आदि शंकराचार्यांनी केली होती.

या मंदिराबाबत असे सांगण्यात येते की या मंदिराच्या खांबाशी निगडित एक रहस्य आहे. ते सोडविण्यात विज्ञानालाही अद्याप यश आलेले नाही. मंदिराच्या चारही दिशांना एक-एक दरवाजा आहे. याच्या खांबाबाबत मंदिर प्रशासनाचा दावा आहे की याची मोजदाद कुणालाही करता येत नाही. मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानूसार अनेक लोकांनी हे खांब मोजण्याचा प्रयत्न केला. पण असे करणाऱ्या व्यक्तीसोबत वाईट घटना घडल्या. अद्याप यामागील कारणाचा शोध विज्ञान देखील घेऊ शकलेले नाही. कॅमेऱ्याच्या मदतीने खांब मोजण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यात यश आले नाही.

असे सांगण्यात येते की देवी सतीचे ३ नेत्र येथे पडले होते. येथे महालक्ष्मीचा निवास असल्याचे सांगण्यात येते. मंदिरात होणारा किरणोत्सवही विशेष असतो. वर्षातुन एकदा महालक्ष्मीच्या मुर्तीवर सुर्यकिरण पडतात. या मंदिराच्या उभारणीत चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही. मंदिरात महालक्ष्मीची ३ फुट उंच चतुर्भुज मुर्ती आहे. काही जण असेही सांगतात की तिरुपती म्हणजे भगवान विष्णुचा राग आल्याने त्यांची पत्नी महालक्ष्मी कोल्हापूरला आली. तिरुपती देवस्थानाहून काही वर्षांपासून आलेली शाल दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मीला घालण्यात येत होती. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला करवीर निवासी अंबाबाई असेही म्हटले जाते. दिवाळीच्या दिवशी महाआरतीच्या वेळी मागितलेली इच्छा पूर्ण होते असेही म्हटले जाते.