ट्रान्सजेंडर पुरुषाने दिला गोंडस बाळाला जन्म

transgender
एका गोंडस बाळाला ३० वर्षीय कॅसी सुलिवान या ट्रान्सजेंडरने जन्म दिला. सोशल मीडियावर बाळाचे फोटो शेअर केले असून त्याच्या मुलाचे नाव त्याने फिनिक्स असे ठेवले आहे. एका सर्जरीद्वारे कॅसीने मुलाला जन्म दिला आहे. त्याने यासाठी जवळपास सात दिवस प्रसुतीवेदना सहन केल्या होत्या.

कॅसीच्या प्रेग्नेंसीची ट्रान्सजेंडर असल्याने अनेकांनी थट्टा केली. रस्त्यावर भेटणारे लोक त्याच्या बेबी बंपला पाहून त्याची मस्करी करत होते. कॅसीने सांगितले की, फिनिक्सचा डिलिव्हरीनंतर आवाज ऐकला, तेव्हाचा तो क्षण शब्दात सांगणे फार कठीण आहे. लोकांची प्रेग्नेंसीवर प्रतिक्रिया ऐकून फार वाईट वाटल्याचेही तो म्हणाला. परंतु त्याकडे आपण दुर्लक्ष केले.

याबाबत कॅसीने सांगितले की, केवळ महिलांनाच मुलांना जन्म देण्याचा अधिकार नाही तर पुरुषांना देखील आहे. मी पुरुष असतानाही प्रसुती वेदना सोसल्या. सकाळचा थकवा या सगळ्या गोष्टी अनुभवल्या. डिलिव्हरीचे फोटोज् आणि व्हिडिओज् कॅसीने फेसबुक आणि युट्युब चॅनलद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. दुसरे ट्रान्सजेंडरही याद्वारे त्यांच्या स्वतःच्या मुलांचा विचार करु शकतील.

Leave a Comment