फेसबुक, इंस्टाग्रामवरील शंभराहून अधिक अकाऊंट ब्लॉक

facebook
वॉशिंग्टन : मध्यावधी निवडणुकांचे जोरदार वारे अमेरिकेमध्ये वाहू लागले असून दोन वर्षांपूर्वी निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप असणाऱ्या फेसबुकने सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. फेसबुकने निवडणुकीपूर्वी आक्षेपार्ह वाटणारी ११५ खाती ब्लॉक केली आहेत.

फेसबुकवर अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीमध्ये सोशल प्रचारावेळी गैरवापर झाल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. यावर सुनावणीही सुरु ऑन त्यातच नुकतेच ९ लाखांवर खाती हॅक झाली होती. येत्या काळात भारतातही निवडणुका येऊ घातल्या आहेत. यामुळे अमेरिकेसह भारतातील सरकारांना आश्वस्त करण्यासाठी फेसबुकने पहिले पाऊल उचलले आहे. फेसबुकवरील ३० आणि इन्स्टाग्रामवरील ८५ खाती फेसबुकने आज ब्लॉक केली आहेत.

Leave a Comment