यंदाच्या लक्ष्मीपूजनाला मोदींच्या प्रतिमेची पूजा?

goldbiscutis
दिवाळीत पाडवा आणि लक्ष्मीपूजन या दिवशी पैसे, सोने चांदी याची पूजा करण्याची प्रथा भारतात आहे. यंदाच्या दिवाळीला लक्ष्मीपूजनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा असलेल्या सोन्याच्या बिस्किटांची पूजा अनेक घरात केली जाणार आहे. याचे कारण म्हणजे सुरत मधील एका सराफाने यंदा मोदी आणि माजी पंतप्रधान कै.अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमा असलेली चांदी व सोन्याची बिस्किटे विक्रीसाठी आणली आहेत आणि ग्राहकांमध्ये ती खूपच लोकप्रिय झाली आहेत.

दर दिवाळीला लक्ष्मी गणेश यांच्या प्रतिमा असलेली चांदी सोन्याची नाणी, बिस्किटे खरेदी करून त्याची पूजा करण्याची प्रथा अनेक घरात पाळली जाते. सुरत मधील एका ग्राहकाने मोदी आम्हाला भगवान स्वरूप आहेत असे सांगून यंदा यांची प्रतिमा असलेली सोन्याची नाणी खरेदी करून त्याची पूजा करणार असल्याची भावना व्यक्त केली. अर्थात यापूर्वीही मोदी यांची प्रतिमा असलेल्या सोन्याच्या आणि चांदीच्या राख्या रक्षाबंधनाच्या निमित्त बाजारात आल्या होत्या आणि त्यांचीही धडाक्याने विक्री झाली होती.

Leave a Comment