लाख मोलाचा सिल्व्हरटिप्स इम्पिरिअल चहा

chaha
जगात चहा शौकिनांची संख्या प्रचंड आहे आणि कोणत्याही वेळी चहाचा एक कप फस्त करण्याची त्यांची तयारी असते. कुणाच्या घरी आपण गेलो तरी प्रथम चहा घेणार का अशी विचारणा बहुतेक ठिकाणी होते. सणासुदीच्या निमित्ताने अथवा खास समारंभ असेल तर अनेक घरातून महागडे पदार्थ आवर्जून केले जातात. मात्र केवळ भारतात त्यातही दार्जीलिंगच्या मकाईबाडी चहा मळ्यात पिकणारा चहा हा सर्वसामान्यांच्याच काय पण श्रीमंत लोकांच्या आवाक्यातील नाही हा अनुभव येतो.

सिल्व्हरटिप्स इम्पिरिअल चहा असे त्याचे नाव आहे. ब्रिटनच्या राजघराण्याचा हा चहा अतिशय आवडता मानला जातो आणि त्यामुळेच भारताचे पंतप्रधान मोदी जेव्हा ब्रिटनच्या राणीच्या भेटीला गेले तेव्हा त्यांनी भेट म्हणून हा चहा नेला होता. हा खास चहा किलोला १ लाख ३६ हजार रुपये अश्या किमतीला विकला जातो आणि तो जपान, ब्रिटन आणि अमेरिकेतील ग्राहक मोठ्या संखेने खरेदी करतात.

makai
या चहाची तोडणी पौर्णिमेच्या रात्री केली जाते. हि तोडणी करणारे खास मजूर असतात. रात्री मशाली पेटवून, गाणी म्हणत या चहाच्या कळ्या खुडल्या जातात आणि सूर्योदय होण्यापूर्वी त्याचे पॅकिंग केले जाते. सूर्याचा प्रकाश त्यावर पडला तर त्याचा रंग, वास आणि तेज नाहीसे होते असे सांगतात. मकाईबाडी येथे वर्षाला फक्त ५० ते १०० किलो इतकेच या चहाचे उत्पादन होते.

हा चहा अँटी एजिंग म्हणजे वृद्धत्वाला दूर ठेवणारा आहे. याच्या सेवनाने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात आणि चहा पिणाऱ्याला वेगळ्याच उत्साह आणि स्फूर्तीची प्रचीती येते. हा चहा म्हणजे पृथ्वीवरचे अमृत मानला जातो.

Leave a Comment