माओवाद्यांशी संबंध : गोन्सालवीस आणि परेरा यांना अटक

Maoist
पुणे – शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयाने माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून नजरकैदैत असलेल्या वर्णन गोन्सालवीस, अॅड. सुधा भारद्वाज आणि अरुण परेरा यांचा जामीन अर्ज फेटाळूल्यानंतर गोन्सालवीस आणि परेरा यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना यापुढील कारवाईसाठी आज पुण्याच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

मानवाधिकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांचा जामीन अर्ज पुण्याच्या विशेष न्यायालयाने फेटाळताच महाराष्ट्र पोलीस भारद्वाज यांच्या अटकेसाठी हरियाणातील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. पुणे पोलिसांनी कथित नक्षल संबंधांवरुन २८ ऑगस्ट रोजी देशभरातील विविध ठिकाणांहून कवी वरावर राव, गौतम नवलखा आणि या तीन जणांना अटक केली होती. भीमा कोरेगाव दंगल आणि त्यापूर्वी आयोजित एल्गार परिषदेशी यांचा संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Leave a Comment