मुंबई : कोट्यावधींचा दंड अॅपल आणि सॅमसंगला सुनावण्यात आला असून त्यांच्यावर जाणूनबुजून ग्राहकांचे फोन स्लो आणि निकामी करण्याचा आरोप ठेवण्यात आला असून हा दंड रोम आणि इटलीच्या प्राधिकरणाने सुनावला आहे. त्यांनी अॅपल आणि सॅमसंग या दोन्ही कंपन्या बेईमान असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. अॅपल आणि सॅमसंगवर इटलीच्या प्रतिस्पर्धा आयोगाने (एजीसीएम) एक कोटी आणि 57 लाख डॉलर्सचा दंड ठोठावला आहे.
अॅपल, सॅमसंगने ग्राहकांना सिस्टीम अपडेटच्या नावाखाली गंडवले
सॉफ्टवेयर अपडेट करण्याच्या बहाण्याने अॅपल आणि सॅमसंग या दोन्ही कंपन्या मुद्दाम ग्राहकांचे फोन स्लो करत असल्याचे तसेच कार्यप्रणाली बिघडवत इटली प्रतिस्पर्धी आयोगाने म्हटले. २०१६ मध्ये ‘आयफोन’ आपल्या ग्राहकांना सारखेसारखे सॉफ्टवेयर अपडेट करण्याचे नोटीफिकेशन पाठवत होता. हे अपडेट आगामी येणाऱ्या आयफोन ७ ला डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत होते. ग्राहकांचे फोन आपण स्लो करत असल्याचे, तसेच यामुळे सिस्टिममध्ये बिघाड होऊ शकतो असे यावेळी ‘आयफोन’ने सांगितले नाही.
दुसरीकडे लोकांच्या मनातील विश्वास असलेल्या सॅमसंगनेही ग्राहकांसोबत धोका केला आहे. गूगलची अॅण्ड्रॉइड सिस्टिमचे नवे वर्जन सॅमसंगने आपल्या ग्राहकांना इंस्टॉल करण्यास सांगितले. हे बदल गॅलेक्सी नोट ७ डोळ्यासमोर ठेवून होत होते. हे अपडेट होताच ग्राहकांचे गॅलेक्सी नोट वापरकर्त्यांचे जुने फोन निकामी झाले.