नीरव मोदीची हाँगकाँगमधील २५५ कोटींची संपत्ती जप्त

nirav-modi
नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) पीएनबी घोटाळाप्रकरणी नीरव मोदी विरोधातील कारवाई सुरूच असून ईडीने आज नीरव मोदीची हाँगकाँगमधील तब्बल २५५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. या संपत्तीसह पीएनबी घोटाळा प्रकरणात नीरव मोदीच्या जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचा आकडा आता ४ हजार ७४४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

ईडीने या महिन्याच्या सुरुवातीलाच नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोकसीशी संबंधित २१८ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. ईडीच्या रडारवर त्यांची संपत्ती आहे. मोदी आणि चोकसी यांनी पंजाब नॅशनल बँकेत तब्बल १३ हजार ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असून ते सध्या देशातून फरार आहेत. मनी लांड्रिंग कायद्यांतर्गत नीरव मोदी आणि इतर आरोपींविरोधात ईडीची कारवाई सुरू आहे. याअंतर्गत नीरव मोदीची देश आणि विदेशातील संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

Leave a Comment