पहिले क्रिप्टोकरन्सी एटीएम बंद, संचालकाला अटक

currency
बंगलोर येथे देशातील पहिले क्रिप्टोकरन्सी एटीएम सुरु करणाऱ्या युनोकॉइन टेक्नोलॉजीचे सहसंस्थापक हरीश बाबी यांना बंलोर पोलिसांनी अटक केली असून त्यांना १ आठवडा तुरुंगात टाकले गेले आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी १ टेलर मशीन, २ लॅपटॉप, १ मोबाईल, आणि १ लाख ८० हजार रोख रक्कम जप्त केली आहे. हे एटीएम विना परवाना सुरु करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या एटीएम मधून क्रिप्टोकरन्सीची खरेदी विक्री करता येत होती. यातून ग्राहक रोज १ हजारापासून १० हजार पर्यंत देवघेव करू शकत होते. मात्र केंद्र सरकारने फेब्रुवारी मध्येच बँका, वित्तीय संस्थाना क्रिप्टोकरन्सी देवघेव करण्यावर बंदी घातली होती. त्यामुळे फक्त विदेशी बँकातून खाती असणारे ग्राहकच क्रिप्टोकरन्सीची देवघेव करू शकत होते. त्यावर युनीकॉइनने क्रिप्टोकरन्सी एटीएमचा मार्ग काढला होता. हि कंपनी ३० प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करते.

भारतात क्रिप्टोकरन्सीचे १३ लाख युजर असून गुंतवणुकीसाठी ते क्रिप्टोकरन्सी खरेदी करतात आणि किंमत वाढली कि विकून नफा कमावतात. सरकारने क्रिप्टोकरन्सी व्यवहारावर बंदी आणल्यानंतर हि ग्राहक संख्या १८ टक्क्यांनी वाढल्याचा दावा केला जात आहे.

Leave a Comment