दगडूशेठ गणपतीला राममंदिरासाठी मोहन भागवत यांचे साकडे?

mohan
पुण्यातील प्रसिद्ध आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मंगळवारी विशेष अभिषेक केला. हा अभिषेक अयोध्येत राममंदिर बांधण्याचे काम वेगाने व्हावे यासाठी केला गेल्याचे सांगितले जात आहे. अर्थात संघाकडून याचा खुलासा केला गेलेला नाही मात्र या अभिषेकच्या वेळी घेण्यात आलेला एक व्हिडीओ सार्वजनीक करण्यात आला असून त्यात पुजारी राहूरकर याच्यामागोमाग मंत्रोच्चार करताना राम मंदिर आणि रामराज्य हे शब्द ऐकू येत आहेत.

पत्रकारांशी बोलताना भागवत म्हणाले, आज पुण्यात होतो आणि गणपतीचे आशीर्वाद घेण्याची हि योग्य वेळ आहे म्हणून मंदिरात पूजा आणि अभिषेक केला. पुजारी राहूरकर यांनी मात्र भागवत यांनी अभिषेक करताना देशवासियांना चांगले आरोग्य लाभो, विश्वशांती नांदो, मानवजातीचे कल्याण होवो अशी प्रार्थना केली आणि अयोध्येत राममंदिर होवो आणि रामराज्य येवो अशीही प्रार्थना केली. दसरा मेळाव्यात बोलताना भागवत यांनी नागपूर मध्ये केंद्राने अयोध्येतील राममंदिरासाठी कायदा करून मंदिर निरामानाचा मार्ग मोकळा करावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

Leave a Comment