या कंपन्यांनी आणले आहेत २६० रूपयांपेक्षा कमी नवे प्लान

mobile
मुंबई : तुम्हाला अनलिमिटेड फ्री कॉलिंग डाटाचाही जिओ, वोडाफोन, आणि एअरटेलचे स्वस्त प्रीपेड प्लान्समुळे लाभ होवू शकतो. २६० रूपयांपेक्षा कमी या प्लान्सची किंमत आहे. कंपन्या दिवसेंदिवस आपले प्लान सतत बदलत असतात, याविषयी आपण सतत माहिती घेतल्यास आपल्याला लाभ होतो आणि पैस देखील वाचतात.

वोडाफोनच्या २५५ रूपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये युझर्सना २८ दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. या प्लानवर देशभरातील वोडाफोन ग्राहक अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेतात. त्याचबरोबर यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग असेल, तसेच दिवसाला २ जीबी हायस्पीड डेटा देखील मिळणार आहे. तसेच युझर्सला प्रत्येक दिवशी १०० फ्री एसएमएसचा देखील फायदा होणार आहे. तसेच वापरकर्त्याला टीव्ही स्ट्रिमिंग पाहता येईल, पण प्ले अॅपलच्या माध्यमातून.

भारती एअरटेलचा २४९ रूपयांचा प्लान वापरकर्त्यांना २८ दिवसांची मुदत देते, यात देशभरात एअरटेलचा ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर फोन करून अमार्यादीत बोलू शकतो. या प्लानमध्ये युझर्सला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह, २ जीबी हायस्पीड डेटाचा लाभ मिळतो. तसेच युझर्सला प्रत्येक दिवशी १०० एसएमएस देखील फ्री आहेत.

रिलायन्स जिओच्या १९९ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकाला सर्व लाभांसाठी, १९९ दिवसात २८ दिवसांची मुदत दिली जाते. या प्लानमध्ये युझर्सला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगसह, २ जीबी हायस्पीड डेटाचा लाभ मिळतो. तसेच युझर्सला प्रत्येक दिवशी १०० एसएमएस देखील फ्री आहेत.

Leave a Comment