पत्नीपिडीत पुरुष संघटनेने दसऱ्याला केले शूर्पणखा दहन

shurpnakha
महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथे बायकोच्या जाचाला कंटाळलेल्या पुरुषांसाठी काम करणाऱ्या पत्नीपिडीत पुरुष संघटनेने यंदाचा दसरा वेगळ्या पद्धतीने साजरा केला. दसऱ्यादिवशी रावण दहन करण्याची परंपरा मोडून या संघटनेने शूर्पणखेचे दहन केले. हा कार्यक्रम औरंगाबाद जवळच्या करोली गावात गुरुवारी पार पडला.

या संस्थेचे संस्थापक भारत फुलारे म्हणाले, राम रावण याच्यात युद्ध होण्याचे कारण शूर्पणखाच होती. ती रावणाची बहिण होती आणि तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी रावण साधू बनून आला आणि त्याने सीतेचे अपहरण केले. याचमुळे रावण आणि राम यांच्यामध्ये युद्ध झाले. भारतात सर्व कायदे पुरुष विरोधात आणि महिलांच्या बाजूचे आहेत. छोट्या छोट्या गोष्टीसाठी बायका नवरा आणि सासरच्या मंडळीना त्रास देण्यासाठी या कायद्यांचा दुरुपयोग करतात. २०१५ ची आकडेवारी सांगते, कि देशात पुरुषांनी केलेल्या आत्महत्यामध्ये ७४ टक्के विवाहित पुरुष आहेत. भिलारे यांनी यावेळी मी टू अभियानाविषयी प्रश्न उपस्थित केले.

Leave a Comment