ही तथ्ये तुमच्या परिचयाची आहेत का?

world
या जगामध्ये अस्तित्वात असलेल्या अनेक गोष्टींबद्दल अनेक तथ्ये आहेत. ही तथ्ये आपल्याला सामान्य विज्ञानाच्या पुस्तकामध्ये वाचून माहिती असतात. पण अशी ही अनेक तथ्ये आहेत, ज्यांच्याबद्दलचे उल्लेख सहसा कुठे आढळत नाहीत. पण ही तथ्ये रोचक आहेत, यात शंका नाही.
जगातील सर्वात मंदगती प्राणी म्हणून कासवाची ओळख आपल्याला माहिती आहे. अतिशय धीम्या गतीने चालणारे कासव दीर्घायुषी प्राण्यांपैकी एक आहे हे ही आपल्याला माहिती आहे. अश्या या प्राण्याला दात नसतात. दर वर्षी २३ मे हा दिवस विश्व कासव दिवस म्हणून साजरा होतो हे तथ्य मात्र फारसे माहिती नसते. कासवांच्या ३१८ पेक्षा जास्त प्रजाती पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. हिंदू धर्मामध्ये कासवाला महत्वाचे स्थान आहे. ज्या ठिकाणी कासव असते, त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते, म्हणूनच घरामध्ये कासवाची प्रतिकृती योग्य दिशेला ठेवणे शुभफलदायी समजले जाते. या प्रतिकृतीमुळे सकारात्मक उर्जेला चालना मिळते.
world1
जगामध्ये डुकरांची संख्या २ अरब पेक्षा जास्त आहे. यामधील अर्धी संख्या त्यापासून मांस मिळविण्यासाठी दर वर्षी मारली जात असते. डुक्कर हे जनावर अतिशय हुशार समजले जाते. या जनावराला चव्वेचाळीस दात असून, हा प्राणी एका दिवसात पन्नास लिटर पाणी पिऊ शकतो. फ्रांसची राजधानी पॅरिस येथे माणसांच्या पेक्षा कुत्र्यांची संख्या जास्त आहे. या ठिकाणी सार्वजनिक वाहनांमधूनही कुत्र्यांना नेण्यास मनाई नाही. तसेच न्यूझीलंड देशामध्ये लोकांची संख्या चाळीस मिलियन, तर मेंढ्यांची संख्या ७० मिलियन आहे.
world2
बुद्धिबळ हा एखाद्याच्या बौद्धिक क्षमतेचा ठाव घेणारा खेळ आहे. या खेळाचा आविष्कार भारतामध्ये झाला असून, हा खेळ खेळणाऱ्यांचा बौद्धिक विकास अतिशय झपाट्याने होत असल्याचे मनोवैज्ञानिक म्हणतात. अश्या व्यक्तींना जटील प्रश्न सोडविणे सहज साध्य होत असते. शहामृग हा जगातील सर्वात मोठा पक्षी आहे. या पक्ष्याचे डोळे त्याच्या मेंदूपेक्षा आकाराने मोठ असतात. हा पक्षी ताशी साठ ते सत्तर किलोमीटरच्या गतीने धावू शकते. शहामृग मादी एका वर्षामध्ये पनास ते साथ अंडी देते. डॉल्फिन मासा पाच ते आठ मिनिटांच्या काळाकरिता आपला श्वास रोखून धरू शकतो. असेच निद्रा घेत असताना हा मासा आपला एक डोळा खुला ठेवून झोपू शकतो.