येथे झुरळांपासून बनवला जातो अतिशय पौष्टिक ब्रेड

bread
प्रत्येक घरामध्ये आवडीने खाल्ला जाणारा ब्रेड आता अतिशय पौष्टिक रुपामध्ये अवतरला आहे. पण या ब्रेडमध्ये हे पौष्टिक गुण आले आहेत, ते त्यामध्ये झुरळांचा वापर केल्याने. हा ब्रेड बनविण्यासाठी जे पीठ वापरले जाते, त्यामध्ये वाळविलेल्या झुरळांची पूड मिसळली जाते. हा ब्रेड सध्या पाश्चिमात्य आणि आफ्रिकी देशांमध्ये खूपच लोकप्रिय होत आहे. मनुष्याच्या आहारातील पोषक तत्वांची कमतरता कशी भरून काढता येईल याचा शोध घेतला असता, वाळविलेल्या झुरळांची पूड वापरून ब्रेड बनविला असता, हा ब्रेड अतिशय पौष्टिक असल्याचे लक्षात आल्याने आता या पद्धतीने ब्रेड बनविला जात असून, तो लोकप्रियही होत आहे.
bread1
काही सर्वेक्षणांवरून, जगभरातील लोकसंख्या काही दशकांमध्ये आणखी जास्त वाढणार आहे. झपाट्याने वाढणाऱ्या जनसंख्येच्या मानाने अन्नाचा पुरवठा तितका झपाट्याने वाढलेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर पौष्टिक अन्नपुरवठा करण्यासाठी आता आपल्या आहारामध्ये किड्यांपासून मिळणारी प्रथिने समाविष्ट करण्याची वेळ आली असल्याचे शास्त्रज्ञ म्हणतात. किडे हे सहज उपलब्ध असून, त्यांच्यापासून मिळणारी प्रथिने ही मनुष्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत असल्याने आता झुरळांचा वापर करून दुध, ब्रेड इत्यादी पदार्थ तयार करण्यात येत आहेत.
bread2
दक्षिण पश्चिमी देशांमध्ये हा ब्रेड आता झपाट्याने लोकप्रिय होत असून, आता हा घराघरामध्ये दिसून येऊ लागला आहे. या ब्रेडमध्ये वापण्यात येणारी झुरळे सहज आणि मुबलक मात्रेमध्ये उपलब्ध असल्याने या ब्रेडची किंमत इतर ब्रेड्सच्या मानाने स्वस्तही आहे. ब्रेड बनविण्यासाठी वापरण्यात येणारी झुरळे ‘लोकस्ट कॉकरोच’ किंवा ‘नोफिटा सिनेरा’ या जातीची असून, ही जलद प्रजननक्षमता असणारी आणि त्यामुळेच मुबलक मात्रेमध्ये उपलब्ध असणारी झुरळांची प्रजाती आहे.

Leave a Comment