हुवावेला भारतात ५ जीच्या चाचण्यांसाठी आमंत्रण

huwaie
टेलिकॉम उपकरणे बनविणाऱ्या चीनच्या हुवावे कंपनीला भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून देशात ५ जी सेवा चाचण्या घेण्यासाठी आमंत्रण आले असल्याचे हुवावे इंडियाचे सीईओ जे चेन यांनी शुक्रवारी सांगितले. ते म्हणाले दूरसंचार कंपनीकडून २७ सप्टेंबर रोजी आम्हाला आमंत्रण मिळाले असून आम्ही त्यासंदर्भात प्रस्ताव दाखल केला आहे. त्याच्या उत्तराची आम्ही प्रतीक्षा करत आहोत.

दूरसंचार विभागाने देशात ५ जी सेवेच्या चाचण्यांसाठी एरिक्सन, निकीय, सॅमसंग, सिस्को, एनइसी कंपन्यांना आमंत्रित केले असून या कंपन्या स्थानिक कंपन्यांच्या सहयोगाने ५ जी तंत्रज्ञान चाचण्या करू शकणार आहेत. या वर्षाच्या सुरवातीला हुवावेने स्थानिक भारती एअरटेल बरोबर प्रयोगशाळेत या चाचण्या केल्या असून त्यावेळी त्यांनी ३.५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम बँड ३ जीबीपीएस पेक्षा अधिक स्पीड मिळविण्यात यश मिळविले होते. चेन म्हणाले हुवावे भारतात दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहे.

Leave a Comment