आयसीआयसीआय सीईओ चंदा कोचर यांचा राजीनामा- बक्षी नवे सीईओ

kochhar
व्हिडीओकॉन कर्ज प्रकरणात अडचणीत आलेल्या आयसीआयसी बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला असून त्याच्या जागी संदीप बक्षी यांची पाच वर्षासाठी नेमणूक झाली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कोचर यांनी बँकच्या सर्व अन्य पदांचाही राजीनामा दिला आहे.

व्हिडीओकॉन कंपनीला कर्ज देताना नियम पाळले गेले नाहीत आणि कोचर यांनी स्वतःचा फायदा त्यात करून घेतला असे आरोप चंदा कोचर याच्यावर झाल्यानंतर गेले दीड महिना त्या सुटीवर होत्या. या कर्जप्रकरणी अनेक तपास संस्था चौकशी करत असून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी.एन, श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती कोचर यांची चौकशी करत आहे. या प्रकरणात चंदा यांचे पती दीपक आणि दीर याचीही चौकशी केली जात आहे.

चंदा कोचर यांचा राजीनामा मागितला गेल्याच्या बातम्या यापूर्वीच प्रसिद्ध झाल्या असून त्यांना जबरदस्तीने दीर्घ काळाच्या सुटीवर जाण्यास सांगितले गेले होते असेही सांगितले जात आहे. १९ जून २०१८ पासून बँकेच्या सीईओ पदाची तात्पुरती जबाबदारी संदीप बक्षी यांच्या कडे दिली गेली होती ती आता कायम करण्यात आली आहे.

Leave a Comment