२३५ वर्षात प्रथमच खंडित झाली रामलिला

dieria
वाराणसीत रामनगर येथे गेली २३५ वर्षे आयोजित केली जात असलेली रामलिला यंदा प्रथमच खंडित झाली आहे. सतत ४५ दिवस चालणाऱ्या या राम्लीलेला २००५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने वर्ल्ड कल्चरल हेरीटेजचा म्हणजे जगातील सांस्कृतिक परंपराचा दर्जा दिला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही हि ४५ दिवसीय रामलीला सुरु झाली मात्र त्यातील एक दिवस प्रयोग होऊ शकला नाही यामागचे कारणही अनोखेच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमात राम लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांची कामे करणारी मुले एकाचवेळी डायरियाने आजारी पडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. मुख्य भूमिका करणारे आजारी पडल्याने प्रयोग थांबविला गेला. रामलीला सादर करणारा हा सर्व जथ्या एका धर्मशाळेत मुक्कामास होता. तेथील पाणी दुषित होते आणि ते प्यायल्याने हि लहान मुले आजारी पडलीच पण अन्य ३१ जणांनाही डायरियाचा त्रास झाला आणि त्या सर्वांवर लाल बहादूर शास्त्री रुगणालयात उपचार केले गेले अये समजते. असल्या कारणाने रामलीलाचा प्रयोग न होण्याची २३५ वर्षातली हि पहिलीच वेळ आहे.

Leave a Comment