अन् सत्यात अवतरला ‘चॉकलेटचा बंगला’

bunglow
आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्या अंगणवाडी म्हणा किंवा शाळेत आपल्याला ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनरी चमचमता चांगला’ हे बालगीत शिकवले जात होते. त्यावेळी आपल्या मनात असा विचार यायचा की जर कोणीतरी खरच चॉकलेटचा बंगला बांधला तर किती किती मज्जा येईल. पण ही काल्पनिक गोष्ट एका पठ्ठ्याने सत्यात अवतरली आहे. सध्या सोशल मीडियात हे चॉकलेटचे घर चर्चेचा विषय बनले आहे.

चॉकलेटचे एक मोठे घर पॅरिसमधील प्रसिद्ध चॉकलेट आर्टिस्ट जेन ल्युक डिक्ल्युझ्यूने बांधले आहे. या घराच्या छप्परापासून ते भिंती आणि भांड्यांपासून ते पुस्तक, फर्निचरदेखील चॉकलेटपासून तयार करण्यात आले आहे. लोकांना चॉकलेटच्या या आलिशान घरात राहण्याची संधी देण्यात आली आहे. बुकिंग प्रक्रिया पार पाडल्यानंतर या चॉकलेटच्या घरात ठराविक दिवसांपुरता राहता येणार आहे. जवळपास ६०० तास हे घर बांधण्यासाठी कलाकाराला लागले तर १.५ टन चॉकलेट घर बांधण्यासाठी वापरण्यात आले आहे. जरी कलाकाराने या सुंदर चॉकलेटच्या घरात राहण्याची परवानगी दिली असली तरी यातील चॉकलेट कितीही मोह झाला तरी न खाण्याची सक्त ताकीदही त्याने दिली आहे.

Leave a Comment