विवोचा व्ही ११ ऑफर्सच्या वर्षावासह भारतात दाखल

vivi11
चीनी कंपनी विवोने त्याचा नवा विवो व्ही ११ स्मार्टफोन भारतात उपलब्ध केला असून ३० सप्टेंबर पर्यंत ग्राहकांना त्याच्या खरेदीवर अनेक ऑफर्स दिल्या गेल्या आहेत. या फोनची किंमत २२९९० रु. आहे. पर्पल आणि स्टारी नाईट ब्लॅक अश्या फोन रंगात तो मिळणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार तो मेक इन इंडिया योजनेचा एक भाग आहे.

३० सप्टेंबरपर्यंत हा फोन जे ग्राहक खरेदी करतील त्यांना एचडीएफसी क्रेडीट, डेबिट तसेच पेपर फायनान्स कडून २ हजार रु. कॅशबॅक, फ्लिपकार्ट एक्स्चेंज कडून अतिरिक्त २ हजार रु. सुत, कॅपिटल फर्स्ट कि, ५ टक्के कॅशबॅक, रिलायंस जिओ कडून १९८ रु. च्या रिचार्जवर जीओचे ४०५० रु, मूल्याचे अनेक फायदे दिले जाणार आहेत. त्यात १९५० रु. ची जिओ व्हाऊचर दिली जातील.

या फोनला ६.३ इंची फुल एचडी सुपर एमोलेड स्क्रीन, अँड्राईड ओरिओ ८.१ ओएस, ६ जीबी रॅम, ६४ जीबी मेमोरी, ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने २५६ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. फोनला व्हर्टिकल सेट मध्ये रिअरला १६ एमपी व ५ एमपीचा ड्युअल कॅमेरा सेट तसेच सेल्फी साठी २५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. फोनला क्विकचार्ज सपोर्ट करणारी ३३१५ एएमएचची बॅटरी दिली गेली आहे.

Leave a Comment