विवोचा झेड १ ऑनलाईनवर होणार उपलब्ध

vivoz1
चीनी स्मार्टफोन कंपनी विवोने त्यांचा नवा स्मार्टफोन झेड सिरीज मधला विवो झेड १ भारतात उतरविण्याची तयारी केली असून हा फोन फक्त ऑनलाईनवरचा विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. ओप्पोच्या रीलमी ला हा फोन टक्कर देईल असा ९१ मोबाईलचा रिपोर्ट सांगतो.

विवो झेड १ चीनमध्ये नुकताच लाँच केला गेला आहे. या फोनला ६.२५ इंची फुल एचडी प्लस आयपीएस स्क्रीन, ४ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज, १६ एमपीचा फ्रंट तर १३ व दोन एमपीचे रिअर ड्युअल कॅमेरे दिले गेले आहेत. फोनला ३२६० एएमएचची बॅटरी, अँड्राईड ओरिओ ८.१ ओ एस असून हा फोन ऑक्टोबर मध्ये भारतात उपलब्ध होईल असे समजते. हा फोन मिडल रेंज असून १९६०० रु.त मिळू शकेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment