इशा अंबानीचा साखरपुडा झालेले लेक कोमो का आहे खास?

lake-komo
इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो परिसरात भारताचे बडे उद्योजक आणि आशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी याची कन्या इशा हिचा साखरपुडा २१ ते २३ सप्टेंबर या काळात झोकात साजरा झाला आणि त्याचे फोटो मोठ्या प्रमाणांवर शेअर केले जात आहेत. मुकेश अंबानी याची मुंबईतील घर हे जगातील महागड्या घरातील एक असूनही साखरपुड्यासाठी लेक कोमोची निवड करण्यामागे खास कारण आहे.

como
लेक कोमो हे जगातील सर्वात सुंदर ठिकाण आहेच पण ते १० हजार वर्षे जुने आहे. त्याचा आकार इंग्रजी वाय या अक्षराप्रमाणे असून ते १४६ चौरस मैल परिसरात पसरलेले आणि १३०० फुट खोल सरोवर आहे. इटलीतील हे ३ रे मोठे सरोवर आहे आणि अतिशय नयनरम्य परिसरात आहे. रोमन काळापासून ते पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. या सरोवराच्या परिसरात अनेक छोटी छोटी गावे असून गोथिक शैलीतील येथील इमारती आणि रंगीबेरंगी घरे हे याचे वैशिष्ट आहे. हे सरोवर रोमन लोकांच्या ताब्यात आल्यावर त्याचे महत्व अधिक वाढले.

komo
रोमन राजा ऑगस्टस यांने या सरोवराचा वापर पो व ह्राईन व्हॅली व्यवसायासाठी केला तर इसवी सन ४९ पूर्वी ज्युलियस सीझरने ५ हजार लोकांसह येथे शासन केले होते. त्यावेळी या सरोवराचे नाव लारीयास असे बदलले गेले होते. या सरोवराच उल्लेख अनेक गीतांमध्ये येतो. रेशीम उद्योगासाठी हा भाग जगप्रसिद्ध असून येथे उत्तम प्रतीचे फर्निचर मिळते. मे ते सप्टेंबर हा सिझन येथे भेट देण्यासाठी उत्तम असून या सरोवरच्या परिसरात बेलजिओ, मेनाजू अशी अनेक सुंदर गावे आहेत. येथील व्हेरेंना गाव रंगीबेरंगी घरे, अनेक बागा आणि बगिच्यांसाठी प्रसिद्ध असून या सरोवर परिसरात श्रीमंत लोकांच्या अनेक हवेल्या, घरे बांधली गेली आहेत.

Leave a Comment