
हॉवर्ड विद्यापीठातील संशोधकांनी एक्सोसूट या नावाने एक सूट विकसित केला असून हा सूट घातला कि कितीही अंतराचा प्रवास न थकता करता येणार आहे. सर्वसामान्य लोकांप्रमाणे सेनेतील जवान, अग्निशमन दलाचे जवान, बचाव कार्यातील रक्षक तसेच किचकट आणि अवघड काम करावे लागणे लोक आणि म्हातारी माणसे या सूटचा वापर करू शकणार आहेत. गुडघे दुखीने हैराण लोक किंवा ज्यांना चालणे अवघड आहे असे लोक हा सूट घातल्यावर कितीही अंतर न थकता पार करू शकतील असा दावा केला जात आहे.
एक्सोसूट घाला आणि न थकता कितीही प्रवास करा

एकदा हा सूट घालून चालायला सुरवात केली कि त्यात बसविलेली उपकरणे व्यक्तीच्या क्षमतांचा अंदाज घेऊन त्यानुसार शरीराच्या होत असलेल्या प्रतिक्रिया नियंत्रित करतात. दमणूक कमी होण्यासाठी काय करायला हवे याचा अंदाज घेऊन स्वचालित त्युनिग मेथड नुसार व्यक्तीच्या आकारानुसार हा सूट आकार घेतो. तो कपड्यापासून बनविले गेला आहे आणि त्यात हात, मांड्या, जांघा, पिंढरया या अवयवांवर तो घालता येतो. कमरेजवळ त्याला एक मोबाईल एक्सट्युएसन सिस्टीम बसविली गेली असून त्याला जोडलेल्या वायर कार्यान्वित होतात. या मुळे खुब्याच्या हाडांना चालण्यास मदत मिळतो. चालताना हा भाग सर्वात अधिक दमत असतो त्याला त्यामुळे आराम मिळतो. सायकल प्रमाणे हा सूट काम करतो. या सूट मुळे कमी उर्जा खर्च केली जाते.
हा सूट वापरायला अतिशय सुलभ असून युजर फ्रेंडली आहे. जड, बारीक कुणीही व्यक्ती तो वापरू शकते, वजनाला हलका असल्याने त्याचा त्रास होत नाही.
