पीएफवरील व्याजदरात ०.४ टक्क्यांची वाढ

EPF
नवी दिल्ली – केंद्र सरकारने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र पीपीएफसह अन्य अल्प बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना गुडन्यूज दिली आहे. ऑक्टोंबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी अल्प बचत योजनांवरील व्याजदरात सरकारने ०.४ टक्के वाढ केली आहे. दर तिमाहीत अल्प बचत योजनांवरील व्याजदरात बदल होत असतात.

७.८,७.३ आणि ८.७ टक्के वाढ ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याजदरात करण्यात आली आहे. तर पीपीएफ आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचा व्याजदर आठ टक्के करण्यात आला आहे. हा व्याजदर सध्या ७.६ टक्के एवढा होता. किसान विकास पत्रावर ७.७ टक्के व्याज देण्यात येईल. याआधी ७.३ टक्के व्याज मिळायचे. खास मुलींसाठी सुरु करण्यात आलेल्या सुकन्या समृद्धी योजनेवर ८.५ टक्के व्याज देण्यात येईल. याआधी हा व्याजदर ८.१ टक्के होता. त्यामध्ये ०.४ टक्के वाढ करण्यात आली आहे. एक ते तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर ०.३ टक्के जास्त व्याज मिळणार आहे.

Leave a Comment