व्हिडिओ; इंडोनेशियातील हा २ वर्षाचा चिमुकला चक्क अजगरासोबत खेळतो

python
जकार्ता – तुम्ही आतापर्यंत अजस्त्र अजगराचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील. ते पाहताना अनेकांच्या अंगावर काटा देखील येत असेल. पण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत २ वर्षाचा मुलगा चक्क अजगरासोबत खेळताना दिसतो आहे. इंडोनेशियातील एका गावातील हा व्हिडिओ आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. या अजगरासोबत तो लहान मुलगा खेळताना दिसून येत आहे. १५ फुटांपेक्षा जास्त व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या अजगराची लांबी असल्याचे सांगितले जात आहे. अशाप्रकारच्या अजगरांचा इंडोनेशियामध्ये वावर ही सामान्य गोष्ट आहे. पण हा अजगर त्या मुलाच्या परिवाराने पाळल्याचा दावा काही जण करत आहे.