हौशेला मोल नाही म्हणून भारतीय लोक या कामासाठी घेतात लाखोंचे कर्ज…

travel
मुंबई – हौशेला मोल नाही अशा आशयाची म्हण आपल्याकडे आहे. त्याचीच प्रचिती आता काहीशी येत आहे. विदेशी दौरे करणाऱ्यांच्या यादीत सध्या भारताचे नाव वर आलेले असून आपले काम आणि ज्ञानासाठी ओळखले जाणारे भारतीय आता भ्रमंतीसाठी देखील ओळखले जाऊ लागले आहेत.

शिक्षणाशिवाय शॉपिंग आणि दुसऱ्या देशात पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी भारतीय लोक इतर देशांत फिरण्यासाठी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत एका वृत्तपत्राने दिलेल्या अहवालानुसार, भारतीयांनी गेल्या ५ वर्षात २५३ पेक्षा अधिक वेळा सातासमुद्रापार प्रवास केला आहे. भारतीयांनी २०१३-२०१४ दरम्यान १६ मिलीयन एवढी रक्कम आपल्या विदेशवारीवर खर्च केली आहे. वर्तमानात हा आकडा ४ बिलियन डॉलरपर्यंत पोहचला आहे. म्हणजेच केवळ ३ वर्षात एका भारतीयाच्या विदेशवारीवरील खर्च हा जवळपास २५३ टक्क्यांनी वाढला आहे.

गेल्या काही वर्षात फिरण्याच्या व्यतिरिक्त भारतीयांमध्ये विदेशात शिक्षण घेण्याचा ट्रेंड तेजीने वाढताना दिसत आहे. उल्लेखनीय बाब ही आहे की, काही दिवसांपूर्वी आलेल्या एका अहवालानुसार भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत अमेरिका यात सर्वात वर आहे. २००८ पासून जर्मनीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ११४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अहवालात म्हटले आहे की, भारतीय विदेश दौऱ्यांवर जाणे आणि तेथे गेल्यावर फिरण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करतात. बँकिंग सेक्टरशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की, आता विदेशवारीसाठी कर्ज घेणेही फार सोपे झाले आहे. देशाच्या मोठ्या प्रायव्हेट बँकशी जोडलेले वित्तीय सल्लागार म्हणतात की, बँकेकडे ट्रॅव्हल लोन्ससाठी काही वेगळे पर्याय उपलब्ध नाहीत. पण, लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पर्सनल लोनही घेतात.

२३ मिलियन भारतीयांनी वर्ष २०१७ मध्ये विदेशवारी केला आहे. एकीकडे देश तेल आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य आयात करण्यासाठी पूर्णपणे दुसऱ्या देशावर अवलंबून असल्यामुळे भारतीयांचा हा खर्च आपल्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक प्रभाव टाकतो आणि बॅलेंस ऑफ पेमेंट देखील मोठ्या प्रमाणावर प्रभावित होत आहे. सध्या विदेशात संपत्ती खरेदी करण्यात भारतीयांना अधिक रुची राहिलेली नाही.