सौदीने प्रथमच महिला पायलटसाठी मागविले अर्ज

pilots
सुधारणांचे वारे वाहू लागलेला मुस्लीम बहुल सौदी अरेबियाने महिलांसाठी विमानचालक प्रशिक्षण वर्ग सुरु केल्यानंतर आता प्रथमच पायलट आणि फ्लाईट अटेंडन्ट पदासाठी अर्ज मागविले आहेत. रियाध फ्लायनान्स एअरलाईन कंपनीने असे अर्ज मागविले असुन त्याला चोवीस तासात देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या कंपनीकडे पायलट आणि फ्लाईट अटेंडन्ट पदासाठी १ हजाराहून अधिक अर्ज एका दिवसात आले असल्याचे समजते.

सौदीचे प्रिन्स सलमान यांच्या व्हिजन २०३० नुसार अनेक नवे बदल देशात केले जात आहेत. महिला पायलट हा त्याचाच एक भाग आहे. जूनपासून येथे महिलांना वाहन चालक परवाने दिले जात आहेत तसेच येथील महिला आता पुरुषांच्या परवानगीशिवाय स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय करू शकणार आहेत. केवळ तेल, वायू आणि मक्का येथील महासुलाशिवाय देशाला अन्य उत्पनाचे स्रोत शोधण्याचा प्रयत्न सौदी कडून केला जात असून देशाच्या अर्थव्यवस्थेत महिलांचाही हातभार लागावा यासाठी अनेक नियम बदलले जात आहेत.

Leave a Comment