हे देश करत नाही पेट्रोल-डिझेलचा वापर

petrol
सध्याच्या घडीला आपल्या देशात इंधन दर दररोज वाढत आहेत. हे दर या वेगाने आभाळाला टेकतील असे वाटत आहे. इंधनाची किंमत वेगाने वाढते आहे, आणि आपली इंधनाची गरजही. गाडी न वापरता आपण जगू शकू का आता? नाही ना… पण आम्ही आज तुम्हाला असे काही देश सांगणार आहोत जे पेट्रोल-डिझेलचा वापर करत नाही. पर्यावरणाची हानी होऊ नये यासाठी जगात असेही काही देश आहेत जिथे पारंपरिक इंधनाचा वापर करत नाहीत.

कोस्टा रिका हा देश २०१५पासूनच १०० टक्के ग्रीन झाला आहे. म्हणजे त्यांनी पर्यावरणपूरक बदल आपल्या रोजच्या जगण्यात केले आहेत. या देशातील लोकांचे आजारी पडण्याचे प्रमाण या व्यापक बदलांमुळे कमी झाले आहे. या देशात अपारंपरिक उर्जा साधनांचाच वापर होतो. त्यात मोठा वाटा जलविद्युतचा आहे. ते आपले सगळे उद्योग हायड्रोइलेक्ट्रिसिटीबरोबर बायोगॅस आणि सौर ऊर्जेवर चालवतात.
१९७० पासून डेन्मार्क हा देश पवनचक्क्यांचा वापर करत असल्यामुळे डेन्मार्क देशातील एकूण ४० टक्के लोक या स्वच्छ ऊर्जेचा आनंद घेत आहेत. हा आकडा २०२० पर्यंत ५० टक्के करण्याची त्यांची कल्पना आहे. त्याचबरोबर २०५०पर्यंत १००% अपारंपरिक ऊर्जेवर अवलंबून राहण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

डेन्मार्कच्या पावलावर पाऊल टाकत स्वीडन या देशाने कोळश्याचा कमीत कमी वापर करतो. त्याचबरोबर देश बायोमास ऊर्जा प्रणालींचा विकास देखील करत आहे. स्वीडन २०१० पासूनच जीवाश्म इंधनापेक्षा बायोमासमधून जास्त ऊर्जा प्राप्त केली आहे.

Leave a Comment