यशोगाथा; ३००० कोटींच्या कंपनीचा रितेश अग्रवाल कसा झाला मालक

ritesh-agarwal
ओयो या हॉटेल चेन सर्व्हिसचा रितेश अग्रवाल हा संस्थापक असून आता चीनमध्येही ओयोने आपली सेवा सुरू केली आहे. ही गोष्ट आहे अल्पावधीत यशस्वी ठरलेल्या ओयो रूम्सची कल्पना कशी सुचली याची आणि रितेशच्या ध्यासाची… चला तर मग जाणून घेऊया ३००० कोटींच्या कंपनीचा रितेश अग्रवाल कसा झाला मालक?

४० कोटी डॉलर म्हणजे अंदाजे २८००० कोटी रुपये एवढे ओयो रूम्स या कंपनीचे मूल्य झाले आहे. ओयो रूम्स चीनमध्ये लाँच केल्यानंतर १०व्या महिन्यातच ५० चिनी शहरांमध्ये ५०,०००हून जास्त ओयो रूम्स उघडल्या आहेत. ओयो रूम्सच्या ब्रँडअंतर्गत येणाऱ्या हॉटेल्समधील बुकिंग्ज २० ते २५ टक्क्यांनी वाढली असल्याचे आकडेही समोर आले आहेत.
ritesh-agarwal1
रितेश अग्रवालचा जन्म ओडिशाच्या बिस्सम कटक गावात झाला. रितेशला लहानपणापासूनच फिरण्याची आवड होती. स्टीव्ह जॉब्ज, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग यांच्यासारख्यांच्या कहाण्यांनी तो लहान वयातच प्रभावित झाला होता. आपणही त्यांच्यासारखे काहीतरी नवीन, वेगळे सुरू करावे या विचाराने तो प्रेरित झाला होता. आयआयटीमध्ये अॅडमिशन घेण्याचे सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांचे ध्येय असते. रितेशनेही इंजिनिअरिंगला अॅडमिशन मिळावी म्हणून कोचिंग क्लास जॉईन केला होता. पण त्यात अपयश आल्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ लंडनशी संलग्न असलेल्या रितेशने दिल्लीतील कँपसमध्ये अॅडमिशन घेतले. पण त्याने दोन दिवसातच कॉलेज सोडून दिले. त्याचे पालक त्याच्या या निर्णयाने खूप नाराज झाले. पण रितेशची बिझनेस आयडिया ऐकल्यावर आणि त्यासाठी त्याचे ध्येयाने पछाडलेले काम पाहिल्यानंतर पालकांचाही त्याला पाठिंबा मिळाला.
ritesh-agarwal2
रितेश आपण नोकरी करायची नाही, तर उद्योग करायचा, उद्योगपती व्हायचे या ध्येयाने एवढा पछाडला होता की सुरुवातीला अगदी छोटे-मोठे उद्योग त्याने सुरू केले. रितेश सुरुवातीचे काही दिवस मोबाईल सिमकार्ड विकण्याचाही व्यवसाय केला होता. पर्यटनाची रितेशला आवड होतीच. डेहराडून आणि मसूरीची २००९मध्ये ट्रिप त्याने केली. त्याच्या तिथे लक्षात आले की, अशा अनेक जागा आहेत, ज्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. मग पर्यटनाच्या अशा जागांबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने त्याने ऑनलाईन सोशल कम्युनिटी सुरू केली. मग अशा कम्युनिटीची आयडिया त्याच्या डोक्यात आली की, जिथे प्रॉपर्टीचे मालक आणि सर्व्हिस प्रोव्हायडरना पर्यटकांशी जोडता येऊ शकेल. ओयो रूम्सची कल्पना त्यातूनच प्रत्यक्षात आली. किफायतशीर दरात ब्रेड आणि ब्रेकफास्टची सोय देऊ शकेल अशा हॉटेल्सची लिस्ट त्यातून बनली.

त्याने २०११ मध्ये ओरावेल नावाची कंपनी सुरू केली. गुडगावचे एक गुंतवणूकदार मनीष सिन्हा यांनी रितेशच्या या कल्पनेला पाठिंबा दिला आणि रितेशच्या कंपनीला एंजल स्टार्टअप व्हेंचर म्हणून निधी मिळाला. तरीही फंडिंग मिळवण्यासाठी रितेशला बरीच मेहनत करावी लागली. मार्केटिंग आणि प्रॉपर्टीच्या मालकांपर्यंत पोहोचून त्यांना या सेवेचे महत्त्व पटवून देणे सोपे नव्हते. यामध्ये ३५०० पेक्षा जास्त हॉटेल्स, रूम्स, होम स्टे वगैरेंची यादी आहे. आता रितेश यांच्या कंपनीचा ओयो इन्स, ओयोहॉटेल्स.कॉम या संस्थाही भाग आहेत. यामध्ये किफायतशीर दरातील आणि वेगवेगळ्या सुविधा देणाऱ्या हॉटेल्सची माहिती दिलेली असते.
ritesh-agarwal3
आता भारताबरोबरच चीनमध्ये ओयो रूम्सने हातपाय पसरले आहेत. आपला विस्तार लवकरच आग्नेय आशियात करण्याचे उद्दिष्ट साकार करण्याच्या उद्देशाने रितेशची ही कंपनी मोठे गुंतवणूकदार शोधत आहे. तेही उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ओरावेल डॉट कॉम नावाची कंपनी सुरू केली, तेव्हा रितेश फक्त १७ वर्षांचा होता. ही कंपनीदेशभरातील पर्यटकांना किफायतशीर किमतीत बेड- ब्रेकफास्टच्या सुविधा मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू झाली. आधीच्या गुंतवणूकदारांसह हीरो एंटरप्रायझेसकडून ओयोने २५ कोटी डॉलर्सचे फंडिंग मिळवले. यातून भारत आणि आग्नेय आशियात विस्तार करण्याचे लक्ष्य आहे.