2022 पर्यंत भारतात ब्रिटन आणि फ्रान्सपेक्षा भारतात जास्त श्रीमंत – नाईट फ्रँक

knight-frank
नाईट फ्रँक या आंतरराष्ट्रीय संस्थेने सादर केलेल्या ताज्या अहवालात भारतासाठी एक खुशखबर आली आहे. या संस्थेच्या म्हणण्यानुसार, भारतात 2022 पर्यंत फ्रान्स, रशिया आणि ब्रिटनपेक्षा अधिक श्रीमंत लोक असतील.

वेल्थ रिपोर्ट नावाचा हा अहवाल दर सहा महिन्यांनी प्रकाशित करण्यात येतो. ज्या लोकांकडे 50 कोटी डॉलर किंवा त्याहून जास्त संपत्ती असेल, त्यांची गणना यात श्रीमंत म्हणून करण्यात आली आहे.

यात नाईट फ्रँकने दिलेल्या माहितीनुसार, अब्जाधीश व्यक्तींच्या बाबतीत आता भारत केवळ अमेरिका आणि चीनपेक्षा मागे आहे. भारतात 2017 मध्ये अब्जाधीशांची संख्या 200 होती, ती 2022 पर्यंत 340 एवढी होईल. याच काळात फ्रान्समधील अब्जाधीशांची संख्या 310 तर ब्रिटनमध्ये 220 होईल, असे या अहवालात म्हटले आहे.

येत्या पाच वर्षांत आशिया खंडात श्रीमंत लोकांची संख्या उत्तर अमेरिकेपेक्षा अधिक असेल. मात्र 2022 साली अब्जाधीशांची संख्या अमेरिकेतच सर्वाधिक असेल. ती सध्याच्या 1830 पासून 2500 पर्यंत जाईल, तर चीनमध्ये ही संख्या 490 हून वाढून 990 रुपये एवढी होईल., असा अंदाज यात वर्तविण्यात आला आहे.

Leave a Comment