सेल्फी शौकीनासाठी येतोय शाओमी मी एट युथ स्मार्टफोन

youth
चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमी त्यांच्या मी सिरीज मधील नव्या व्हेरीयंट वर काम करत असून हा नवा फोन मी ८ युथ नावाने बाजारात आणला जाणार असल्याचे वायबो या चीनी सोशल साईटवर प्रसिद्ध झाले आहे. हा फोन खास सेल्फी प्रेमी आणि म्युझिक शौकिनांना नजरेसमोर ठेऊन बनविला जात असल्याचे यात म्हटले आहे.

या फोनला ६.२६ इंची फुल एचडी डिस्प्ले दिला असून तो नॉच सह आहे. ६ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज, ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला जात असून यातील प्रायमरी कॅमेरा १२ एमपीचा तर सेकंडरी कॅमेरा २ किंवा ५ एमपीचा असेल. सेल्फीसाठी २४ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. फोनला क्विकचार्ज सपोर्ट करणारी ३३५० एमएएचची बॅटरी असेल आणि हा फोन ब्लॅक, रोज गोल्ड, व्हाईट, ब्लू, रेड, पिंक, ग्रे, सिल्व्हर आणि ग्रीन रंगात येणार आहे.

Leave a Comment