जॅक मा घेणार अलिबाबाच निरोप

alibaba
चीनची महाप्रचंड इ कॉमर्स कंपनी अलिबाबा चे सहसंस्थापक आणि प्रमुख जॅक मा यांनी निवृतीची घोषणा केली असून सोमवारी त्याच्या ५५ व्या वाढदिवशी ते अलिबाबाचा निरोप घेणार आहेत. १९९९ ला या कंपनीची सुरवात करण्यापूर्वी मा इंग्रजीचे शिक्षक म्हणून काम करत होते. न्यूयॉर्क टाईम्सशी बोलताना मा यांनी निवृतीची घोषणा केली मात्र त्याचवेळी माझ्या कामाचा हा शेवट नाही तर यापुढे शिक्षणावर आधारित जनसेवेला वाहून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

अलिबाबा या कंपनीने अल्पावधीत खूपच प्रगती केली असून शुक्रवारी शेअर बाजार बंद झाला त्यावेळी कंपनीचे मूल्य ४२०.८ अब्ज डॉलर्स म्हणजे ३ लाख कोटी होते. जॅक मा हे श्रीमंतांच्या यादीत वरच्या नंबरवर असून त्यांची संपत्ती ३६.३ अब्ज डॉलर्स आहे. काही काळापूर्वी ते आशियातील सर्वात श्रीमंत होते मात्र रिलायन्सचे मुकेश अंबानी यांनी त्यांना या यादीत मागे टाकत पहिला क्रमांक मिळविला आहे.

Leave a Comment