या मंदिरात पडतो केशर, चंदनाचा पाऊस

medhagiri
भारतात लाखो मंदिरे आहेत आणि लाखोंच्या संख्येने भाविक तेथे दर्शनासाठी जात असतात. भारतातील अनेक मंदिरे केवळ पूजा अर्चेसाठी नाही तर तेथे घडणारया चमत्कारासाठी प्रसिद्ध आहेत आणि हा चमत्कार अनुभवण्यासाठी भाविक मोठ्या तेथे गर्दी करत असतात.

मध्यप्रदेशातील बेतुल जिल्ह्यात सातपुडा पर्वत रंगांच्या मध्ये दाट जगलात असलेले निसर्गसुंदर मुक्तगिरी धाम हे असेच एक मंदिर आहे. असे सांगतात या मंदिरात दर अष्टमीला चंदन आणि केशराचा पाउस पडतो. हे जैन मंदिर आहे.

याची कथा अशी सांगितली जाते कि हजारो वर्षापूर्वी येथे एक मुनी ध्यान करत होते तेव्हा पहाडावरून पडल्याने एक बेडूक मरण पावला. या बेडकाच्या कानात मुनींनी मंत्राचा जप केला तेव्हा तो स्वर्गात देवलोकात पोहोचला. त्यावरून या पर्वताला मेढागिरी पर्वत असे नाव पडले.

असे सांगतात कि स्वर्गात गेलेला हा बेडूक मुनींची भेट घेण्यासाठी येथे आला तेव्हा चंदन आणि केशराचा पाउस पडला आणि दर अष्टमीला असा पाउस येथे पडतो. या पर्वत रांगात लहान मोठी ५२ मंदिरे असून त्यात मुक्तगिरी सर्वात प्रसिद्ध आहे. या मंदिरात जाण्यासाठी ६०० पायऱ्या चढाव्या लागतात.

Leave a Comment