कर्ज देण्याची अजब तऱ्हा

karj
माणसाला आयुष्यात कधीही अचानक आर्थिक अडचण निर्माण झाली अथवा मोठ्या रकमेची गरज निर्माण झाली तर कर्ज घेऊन हि अडचण दूर करण्याची सुविधा जगभरातील बहुतेक सर्व बँक अथवा वित्तीय संस्था पुरवितात. अर्थात यासाठी काही नियम असतात. म्हणजे कर्ज घेणाऱ्याला त्यासाठी काही न काही संबंधित संस्थांकडे गहाण ठेवावे लागते. याला गॅरंटी म्हटले जाते. या प्रकारे घर, शिक्षण, वैद्यकीय उपचार, सहली, कारखरेदी अश्या विविध कारणासाठी कर्ज मिळू शकते.

चीनमधील एका कंपनीत मात्र कर्ज मिळण्यासाठी वेगळीच गॅरंटी द्यावी लागते. येथे कर्ज घेताना मुलींना त्यांचे न्यूड फोटो द्यावे लागतात. हे कर्ज ऑनलाईन मिळते. म्हणजे कर्ज घेण्यासाठी रांगा नकोत, हेलपाटे नकोत. मुलीनी फक्त त्याच्या ओळखपत्रासोबत त्यांचे न्यूड फोटो पाठवायचे असतात. समजा काही कारणाने वेळेत कर्जाचे हप्ते फेडले नाहीत तर हे फोटो संबंधित मुलीचा परिवार, परिचित तसेच सोशल साईटवर मुलीच्या संपूर्ण माहितीसह पोस्ट केले जातात असे समजते.

विशेष म्हणजे या कंपनीचे कर्ज घेणाऱ्यांची संख्या बरीच आहे आणि कर्ज बुडीचे प्रमाण खूपच कमी आहे असेही समजते.

Leave a Comment