फाइव जी सह येणार सॅमसंग गॅलेक्सी एस १०

galaxy
कोरियन जायंट स्मार्टफोन उत्पादक कंपनी त्यांचा आगामी सॅमसंग गॅलेक्सी एस १० तीन व्हर्जन मध्ये बाजारात आणणार असल्याचे आणि हा फोन फाईव जी तंत्रज्ञानासह सादर केला जाणार असल्याचे वृत्त आहे. हा फोन २०१९ मध्ये बाजारात दाखल होत आहे असे समजते. अर्थात ५ जी सह येणारा फोन मर्यादित बाजारपेठेसाठी असेल. भारतात ५ जी साठी २०२० पर्यंत वाट पहावी लागणार असली तरी अमेरिकेत हे तंत्रज्ञान या वर्षअखेरी पर्यंत उपलब्ध होणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस १० साठी कंपनीच्या वायरलेस विभागाने तयार केलेल्या ५ जी अँटेनाचा वापर केला जाणार आहे. या फोनच्या मोठ्या स्क्रीन डिस्प्ले मध्येच फिंगरप्रिंट सेन्सर असेल तर छोट्या स्क्रीनसाठी तो फोनच्या साईड मध्ये दिला जाईल. मोठा स्क्रीन फोन हाय एंड स्पेसिफिकेशन अश येईल. या फोनला ३ दि सेन्सर कॅमेरा असेल आणि त्यासाठी इस्त्राईलच्या मंटीस व्हिजन बरोबर करार केला गेल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment