‘फेसबूक’ला हवे आहेत २० हजार कंटेंट मॉडरेटर्स

facebook
मुंबई : दहशतवाद संबंधित आणि अश्लिल कंटेंट हटवण्यासाठी २० हजार कंटेंट मॉडरेटर्सची नियुक्ती करणार असल्याचे काही दिवसांपूर्वी फेसबूकने सांगितले होते. यासाठीची पावले उचलायला आता फेसबूकने सुरुवात केली आहे. फेसबूकमध्ये नोकरी करण्यासाठी हजारो पदवीधर उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

फेसबूकने कंटेट मॉडरेटर्सची नियुक्ती करण्यासाठी बिजनेस प्रोसेस मॅनेजमेंट (बीपीएम) कंपनी जेनपॅक्टला कंत्राट दिले आहे. मराठी, पंजाबी, तामीळ, कन्नड, उडिया, नेपाळी या भाषांसाठी ही कंपनी कंटेंट मॉडरेटर्स घेणार आहे. यासाठी जेनपॅक्टने ऑनलाईन एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून अर्ज मागवले आहेत.

फेसबूक मॉडरेटर म्हणून नियुक्ती झाली तर यूजरने फेसबूकवर टाकलेल्या कंटेट आणि व्हिडिओला मॉनिटर आणि मॉडरेट करण्यात येईल. फेसबूक मॉडरेटरला लैंगिक शोषण, दहशतवाद, लहान मुलांचे लैंगिक शोषण, आत्महत्येचा लाईव्ह व्हिडिओ आणि हिंसात्मक कंटेटवर कारवाई आणि असा कंटेट डिलीट किंवा ब्लॉक करण्याचे काम करावे लागणार आहे. कंटेंट मॉडरेटर्सना वर्षाला २.५ लाख ते ४ लाख रुपयांचे पॅकेज देण्यात येणार आहे. महिन्याच्या पगाराबरोबरच मंथली इन्सेंटिव्हही मिळणार आहे.

Leave a Comment