आता शॉपिंग अॅप लॉन्च करण्याच्या तयारीत इन्स्टाग्राम

instagram
नवी दिल्ली : लवकरच आपले शॉपिंग अॅप आणण्याची तयारी इन्स्टाग्राम करत आहे. इन्स्टाग्राम यासाठी आयओएस आणि अॅन्ड्रॉईड प्लॅटफॉर्मसाठी वेगळे अॅप तयार करत आहे. ई-कॉमर्ससाठी इन्स्टाग्रामचे हे नवे अॅप प्रामुख्याने असणार आहे. आयजी शॉपिंग (IG Shopping) असे या नव्या अॅपचे नाव असेल असेही बोलले जात आहे.

इन्स्टाग्राम अकाऊंटशी इन्स्टाग्रामचे हे नवे अॅप लिंक असणार आहे. यूजर याद्वारे इन्स्टाग्रामवरून शॉपिंग अॅपपर्यंत पोहोचणार आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती इन्स्टाग्रामने दिलेली नसल्यामुळे हे अॅप कधीपर्यंत लॉन्च होणार याबाबतही काही स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.

याआधी यूट्युबला टक्कर देण्यासाठी इन्स्टाग्रामने आयजीटीव्ही (IGTV) हे अॅप लॉन्च केले होते. एक तासापर्यंत लाईव्ह स्ट्रिमिंग या अॅपमध्ये करता येते. तसेच लाईव्ह स्ट्रिमिंग शेअर करण्याचा पर्यायही यामध्ये आहे. याबाबत ‘द वर्ज’च्या रिपोर्टनुसार या नव्या अॅपवर इन्स्टाग्राम काम करत असून ई-कॉमर्स सेक्टरमध्ये आपला विस्तार करण्यासाठी बाजारातील स्थितीबाबत कंपनी आढावा घेत आहे.

Leave a Comment