इन्स्टाग्राम युजर्स ‘मिया’च्या अदांवर फिदा

mia
मिया अफलोलो नावाची पाच वर्षाची चिमुकली आपल्या मनमोहक अदांमुळे सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर या मुलीचे तब्बल ६६.४ हजार फॉलोअर्स आहेत.

इस्राईलच्या तेल अवीव येथील मिया ही रहिवाशी असून इन्सटाग्रामवर या लहानग्या सुंदर मुलीचे विविध केशभूषेतील आणि ‘ड्रेस’ मधील छायाचित्र चर्चेचा विषय ठरलेले आहेत. या वयात असे छायाचित्र टाकणे योग्य नसल्याचे मत इन्स्टाग्रामच्या काही युजर्सनी व्यक्त केले आहे. तरीही या मुलीच्या निरागस अदांनी सर्वांना घायाळ केले आहे.

Leave a Comment