बहुप्रतीक्षित १०० रुपयांची नवी नोट बाजारात दाखल

note
नवी दिल्ली – १०० रुपयांची नवीन नोट भारतीय रिझर्व्ह बँकने बाजारात आणली असून आरबीआयचे गव्हर्नर उर्जीत पटेल यांचे हस्ताक्षर यावर असून १०० रुपयांची ही नवीन नोट जांभळ्या रंगाची आहे. तर, नोटेच्या मागच्या बाजुला गुजरात येथील राणीच्या ऐतिहासिक बागेचे चित्र छापलेले आहे.

भारतीय संस्कृतीची ओळख करुन देणारी ही नवीन नोट असून ही नोट चलनात आली तरीही जुन्या नोटा सुरूच राहणार असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. या नवीन नोटेचा हळू-हळू बाजारात विस्तार होईल, असेही आरबीआयने म्हटले आहे. जुन्या १०० रुपयाच्या नोटेच्या तुलनेत नवीन नोट आकाराने लहान आहे. नोट दिसायला अत्यंत आकर्षक असून तिचा रंग जांभळा आहे. आरबीआयने यापूर्वी २ हजार, पाचशे, दोनशे आणि १० ची नवीन नोट बाजारात आणली आहे. या नोटेवर देवनागरी भाषेत १०० लिहिले आहे. मध्यभागी महात्मा गांधींचे छायाचित्र छापलेले आहे. तर, अशोक चक्र नवीन पद्धतीने दाखवण्यात आलेले आहे. दृष्टी बाधित व्यक्तींसाठी नोटेवर संकेत दिले आहेत.

Leave a Comment