व्हिडिओ; साडेपाचशे वर्षापूर्वीच्या बौद्ध साधूच्या मृतदेहाचे वाढत आहेत केस आणि नखे

monk
कुल्लू – हिमाचल प्रदेशातील स्पिटी जिल्ह्यातील गुये येथे ठेवण्यात आलेला बौद्ध साधू संघा तेंझिंग यांचा मृतदेह वैज्ञानिकांसाठी एक आव्हान ठरत असून जिवंतपणाची लक्षणे या साधूचा मृतदेह दाखवत आहे, असा धक्कादायक खुलासा आपल्या वैज्ञानिक संशोधन अहवालात करण्यात आल्याने त्यात गुंतागुंत वाढली आहे. तब्बल ५६५ वर्षापूर्वीच्या या मृतदेहावरील केस आणि नखे वाढत असल्याचे समोर आल्यामुळे हे प्रकरण संशोधकांची डोकेदुखी वाढवत आहे.

क्ष-किरण अहवालानुसार कोणत्याही रसायनाशिवाय भुवया, पापण्या आणि हाडे अखंड आहेत आणि रसायनाशिवाय तेंझिंग यांचा मृतदेह सुरक्षित आहे. या ममीची काळजी स्पिटी येथील नागरिक घेतात. तेंझिंग जेव्हा जिवंत होते तेव्हा ते उपाशी राहत होते. मृत्यूची तयारी करत असताना ते स्वत:च्या त्वचेवर मेनबत्ती फिरवत होते आणि ती त्वचा सुकवत असत. मृत्यूनंतर त्यांची ममी करताना त्यांच्यातील चरबी काढताना खूप काळजी घेतली गेली होती. या ममीच्या काही भागाचे १९७५ च्या भूकंपावेळी नुकसान झाल्याने या मृतदेहाच्याबद्दल नागरिकांना माहिती झाली. बौद्ध साधूने स्वत:च्या जीवनाचा त्याग येथील नागरिक आणि गावाचे अस्तित्व टिकून राहावे, यासाठी केला, असा समज येथील नागरिकांत आहे.

जग या मृतदेहाला जरी ममी म्हणत असले तरी माझ्यासाठी ते देव आहेत. शापापासून तेंझिंग गावाचे संरक्षण करतात, असा विश्वास गावातील चहा विक्रेता सूरज प्रक्ष व्यक्त करतो. आपल्या अनुयायींना तेंझिंग यांनी विंचवाचा डंख मारण्यास सांगितले होते. जेव्हा त्यांच्या आत्माने शरीर सोडले तेव्हा क्षितीजावर इंद्रधनुष्य दिसले होते. विंचवाचा ते इंद्रधनुष्य पाठलाग करत होते. तेंझिंग यांनी विंचू अदृश्य झाल्याबरोबर प्राण सोडला. त्यांनी मानव जातीसाठी खूप चिंतन केले, अशी माहितीही सुरज यांनी दिली. तर चेरिंग या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने ही नैसर्गिक ममी असल्याचा दावा केला आहे. तेंझिंग यांचे केस आणि नखे वाढत आहेत. त्यांच्या शरिराला दुखापत झाली तर रक्तही बाहेर येते, असल्याचा दावाही चेरिंगने केला.

Leave a Comment