प्लास्टिकच्या तांदुळापासून राहा सावध !


आजकाल अन्नपदार्थांमध्ये भेसळ असणे ही नित्याचेच झाले आहे. अगदी दुधापासून डाळी, कडधान्ये, दळलेले मसाले, इथपर्यंत सर्वच पदार्थांमध्ये भेसळ दिसून येऊ लागली आहे. असे भेसळ असलेले, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर लोकांच्या आरोग्याला उद्भविलेल्या धोक्याचे किस्से आपण अनकेदा पाहत असतो, ऐकत असतो. त्यामुळे अन्नपदार्थ विकत घेताना ते भेसळयुक्त नसल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. सध्या बाजारामध्ये भेसळयुक्त तांदूळ येत आहेत. हे तांदूळ दिसायला अगदी सामान्य तांदुळाप्रमाणेच असतात, तसेच हे तांदूळ शिजविल्यानंतर त्याचा भातही इतर तांदुळाच्या भाताप्रमाणे दिसतो, मात्र हे तांदूळ प्लास्टिकने बनलेले असतात. अश्या प्रकारचे तांदूळ ग्राहकांना विकून त्याची राजरोस फसवणूक केली जात आहे. त्यामुळे आपण खरेदी करीत असलेले तांदूळ अस्सल आहेत किंवा नाही हे ओळखता येणे अगत्याचे आहे.

तांदूळ अस्सल आहेत किंवा नाही हे तपासून पाहण्यासाठी अनेक उपायांचा अवलंब सहज करता येईल. यातील एक उपाय म्हणजे, आपल्या कडील तांदुळातील थोडे तांदूळ जाळून पाहावे. जर यातून प्लास्टिक जाळल्याप्रमाणे दुर्गंधी येऊ लागली, तर हे तांदूळ प्लास्टिकचे आहेत, हे ओळखावे. अस्सल तांदुळातून प्लास्टिक जाळल्याप्रमाणे दुर्गंधी येत नाही. तांदूळ शिजवून घेऊन त्यातील अतिरिक्त पाणी आटवून पाहूनही ही तपासणी करता येऊ शकते. जर तांदूळ प्लास्टिकचे असतील, तर तांदुळाचे पाणी जसजसे आटत जाईल, तसतसा त्यातून प्लास्टिकचा वास येऊ लागेल.

भात शिजत असताना जर तांदूळ त्यातील पाण्यावर येऊन तरंगू लागले, तर तांदूळ नकली आहे हे ओळखावे. तसेच तांदूळ अस्सल आहे किंवा नाही हे पाण्यासाठी एका कढईमध्ये थोडे तेल चांगले तापवावे व त्यामध्ये थोडे तांदूळ टाकवेत, हे तांदूळ जर प्लास्टिकचे असतील तर गरम तेलामध्ये टाकताच याचे दाणे एकेमेकांना चिकटतील. जा दाणे एकमेकांना न चिकटता तसेच सुटे राहिले, तर तांदूळ चांगला आहे असे ओळखावे.

Leave a Comment