आनंद महिंद्रांची ‘शूज डॉक्टर’ला अनोखी भेट


नेहमीच आपल्या ‘व्हॉट्स अॅप वंडर बॉक्स’मधून काही भन्नाट कल्पना, व्हिडिओ आनंद महिंद्रा शेअर करत असतात. त्यांनी ट्विटरवर चपला शिवणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो महिनाभरापूर्वीच शेअर केला होता. त्याने आपल्या छोट्याशा व्यवसायाची केलेली जाहिरात पाहून आनंद महिंद्रा एवढे प्रभावित झाले होते की त्यांनी त्यावेळी त्याच्यासाठी कमीत कमी जागेत एक लहान दुकान थाटून देण्याचा आपला विचारही बोलून दाखवला होता. महिंद्रानी आपल्या दिलेल्या शब्दाला जागत या व्यक्तीसाठी अखेर सुसज्ज असे मोबाईल दूकान तयार केले आहे. कुठेही सहज व्यावसायिक हे मोबाईल दुकान घेऊन जाऊ शकतो.


हरियाणामधील नरसीजींनी हे जखमी चप्पलाचे रुग्णालय असून येथे सकाळी ९ ते १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ‘जखमी’ चपलांवर जर्मन पद्धतीने उपचार केले जातील, अशी हटके जाहिरातबाजी केली होती. महिंद्रांना ही जाहिरात खूपच आवडली होती. ही जाहिरात पाहून संबधित व्यक्ती हा ‘इंडियन इन्स्टिट्यूड ऑफ मनेजमेंट’मध्ये मार्केटिंग विषय शिकवत असावा असे कौतुक त्यांनी त्यावेळी केले होते. याचवेळी त्याला अर्थिक मदत करण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली होती.


पण नरसीजी आर्थिक साहाय्यऐवजी छोटसं दुकान माझ्यासाठी तयार करता आले तर उपकार होतील असे म्हणाले होते. त्यानंतर नरसीजींसाठी छोटेसे मोबाईल दुकान तयार करण्याचे आदेश त्यांनी आपल्या क्रिएटीव्ह टीमला केले. एवढ्याशा दुकानात चप्पलांपासून ते बसण्याचा बाक राहिल अशी सुविधा महिंद्रा यांच्या क्रिएटीव्ह टीमने केली असून हे दुकान लांबून एका मोठ्या पेटीप्रमाणे भासेल अशा पद्धतीने डिझाइन केले गेले. ते लवकरच नरसीजींपर्यंत पोहोचवण्यात येईल असेही ते म्हणाले.

Leave a Comment