येथे बॉससोबत डेटवर जाणाऱ्या उमेदवाराला मिळणार ६७ लाख पगार


मुंबई : आहे की नाही हटके बातमी… पण ही बातमी वाचायला जरा विचित्रच वाटेल, आणि तुम्ही म्हणाल काय राव कायपण बातम्या देता. पण होय हे खरे आहे. एक अशी कंपनी आहे, जी आपल्या कर्मचाऱ्याला ‘बॉससोबत डेटला जा’ म्हणते. याबाबत कंपनीचे कर्मचाऱ्यातील गुण आणि पात्रता यामुळे कळते असे म्हणणे आहे. या कंपनीचे नाव हिन्ज असे असून ज्याला नाते चांगले समजते आणि ज्याचे संवाद कौशल्य चांगले आहे अशा उमेदवारांची गरज असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. म्हणूनच हे गुण कळायचे असतील तर डेटवर जाण्यापेक्षा दुसरा पर्याय नसल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात येते.

कंपनी या कामासाठी निवडलेल्या उमेदवारास ६७ लाख रुपये पगार देणार आहे. कंपनी पगाराव्यतिरिक्त कर्मचाऱ्याला रेस्टोरंट आणि बारचा खर्चदेखील देणार आहे. पण तुम्हाला असे वाटत असेल की ही नोकरी तुम्ही चुटकीसरशी मिळवू शकता. तेवढे सोप्पे ते नाही आहे. या जॉबसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सोशियोलॉजीची पदवी असणे गरजेचं आहे. जर ही पदवी नसेल तर प्रेम, सेक्स, रिलेशनशिप अशा टॉपिकमध्ये रिसर्च पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवारास मीडिया इंडस्ट्रीतील अनुभव असणे गरजेचे आहे.

याबाबत सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, जरा दमदार काम आम्ही करतो. आम्ही बोलण्यापेक्षा करण्यावर जास्त भर देतो असे हिंज कम्यूनिकेशन डायरेक्टर जीन मैरी मॅग्राथ सांगतात. अॅण्टी रिटेंशन स्पेशालिस्ट या पोस्टसाठी ही नोकरी असून जी पोस्ट रिलेशनशीप एक्सपर्टसारखी असते.

Leave a Comment