फेसबुकचा उपग्रह पुढील वर्षाच्या सुरवातीला अंतराळात झेपावणार


जगातील अब्जावधी ऑफलाईन ग्राहकांना कनेक्ट करण्यासाठी फेसबुक त्यांचा स्वतःचा इंटरनेट उपग्रह अथेना २०१९ च्या सुरवातीला लाँच करणार आहे. द वायर्डने या संदर्भात माहिती दिली असून या उपग्रहांसंबंधीचा प्रस्ताव अमेइर्कन संघीय संचार आयोग (एफइसी) ला सादर केला गेला आहे. या उपग्रहामुळे जगाच्या दुर्गम भागात ब्रॉडबँड सेवा पुरविणे शक्य होणार आहे असे फेसबुक कडून सांगण्यात आले आहे.

पृथ्वीच्या कक्षेत उपग्रहाच्या माध्यमातून इंटरनेट विस्तार करू पाहणाऱ्या कंपन्यात फेसबुक बरोबरच अॅलन मस्क यांची स्पेस एक्स आणि सॉफ्ट बँक पुरस्कृत वन वेब या कंपन्याही प्रयत्नशील आहेत. फेसबुक प्रवक्त्याने भविष्यातील ब्रॉडबँद आधारासाठी उपग्रह महत्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment