आजपासून मिळणार जिओचा नवा फिचर फोन


जिओफोनसाठी एका धमाकेदार ऑफरची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजने केली असून कोणत्याही जुन्या फिचर फोनच्या बदल्यात या ऑफरअंतर्गत नवा जिओफोन अवघ्या ५०१ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. जिओच्या जुन्या ग्राहकांचे फोनही नव्या जिओ फोन २ च्या फिचर्ससह अपडेट होतील. आज संध्याकाळी ५ वाजून १ मिनिटांनी जिओ मान्सून ऑफर लॉन्च होत आहे.

तुम्ही यामध्ये कोणत्याही कंपनीचा जुना फिचर फोन घेऊन जिओचा नवा जिओ फोन २ खरेदी करु शकतात. बदलण्यासाठी आणलेला फोन कार्यरत असावा एवढीच अट ठेवण्यात आली आहे. अशाप्रकारे १५०० रुपयांच्या फोनसाठी तुम्हाला केवळ ५०१ रुपये द्यावे लागतील. कंपनीचा या ऑफरद्वारे आपली ग्राहकसंख्या १०० मिलियनपर्यंत पोहोचवण्याचा विचार आहे.

मुकेश अंबानी यांनी ५ जुलै रोजी रिलायन्सच्या ४१व्या सर्वसाधारण सभेत आपला दुसरा फिचर फोन जिओ फोन २ हा लॉन्च केला होता. व्हॉट्स अॅप, फेसबुक आणि यु ट्यूबचाही सपोर्ट या फोनमध्ये असणार आहे. पण कंपनीने घोषणा केल्यानुसार १५ ऑगस्टनंतरच हे तिन्ही अॅप्स फोनवर कार्यरत होतील.

Leave a Comment