नोकिया एक्स ५, पॉकेट फ्रेंडली स्मार्टफोन


नोकियाचा एक्स ५ हा पॉकेट फ्रेंडली स्मार्टफोन एमएचडी ग्लोबलने चीनमध्ये लाँच केला असून एक्स सिरीजचा हा दुसरा फोन आहे. एक्स ६ यापूर्वीच सादर केला गेला आहे. नव्या फोनची किंमत ९९९९ ते १३९९९ या रेंजमध्ये आहे.

या फोनला ५.८६ इंची एचडी प्लस डिस्प्ले, पॉलीकार्बोनेट फ्रेम, कडेला ग्लास बॉडी दिली गेली असून तो ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज अश्या दोन व्हेरीयंट मध्ये उपलब्ध आहे. अँड्राईड ओरीओ ८.१ ओएस, रिअरला १३ एमपी व ५ एमपीचा व्हर्टिकल कॅमेरा सेट, फ्रंटला ८ एमपीचा सेल्फी कॅमेरा दिया गेला आहे. फिंगरप्रिंट सेन्सर, की ब्रँडिंग, ड्युअल सीम अशी त्याची अन्य फिचर असून तो सी ब्लू, ग्लेशियर व्हाईट आणि नाईट ब्लॅक रंगात मिळणार आहे. हा फोन फोर जी सपोर्ट करतो.

Leave a Comment