‘अदिदास’ करणार पुनर्प्रक्रिया केलेल्या प्लास्टिकचा वापर


बर्लिन – केवळ प्रक्रिया केलेले प्लास्टिक वापरण्याचा निर्णय स्पोर्ट्सवेअरसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘अदिदास’ या ब्रँडने घेतला असून या पॉलिस्टरचा वापर टी-शर्ट्सपासून स्पोर्ट्स ब्रा पर्यंत केला जातो. पॉलिस्टरचा वापर वजनाला हलके असल्यामुळे स्पोर्ट्सवेअर उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. पण आता ‘अदिदास’ने याला फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे.

‘अदिदास’ त्यांच्या ऑफिसमध्ये, गोदामात तसेच वितरण केंद्रांवर प्रक्रिया न केलेल्या प्लास्टिकचा वापर टाळणार आहे. त्यामुळे दरवर्षी ४० टन प्लास्टिक वाचणार आहे. या उपक्रमाला २०१८ पासून सुरुवात होत आहे. त्याचबरोबर स्टारबक्स कंपनीही त्यांच्या दुकानांतून प्लास्टिक स्ट्रॉ हद्दपार करण्याच्या विचारात असून युके आणि आयर्लंडमध्ये मॅकडॉनल्ड्सही स्टारबक्सच्या पावलावर पाऊल ठेवणार आहे. स्विडिश फर्निचर कंपनी इकीने त्यांच्या रेस्तराँ आणि दुकानांतून शुद्ध प्लास्टिक हद्दपार केले आहे.

मागच्या ५० वर्षांत प्लास्टिकचा वापर झपाट्याने वाढला असून तो येत्या २० वर्षात दुप्पट होण्याची शक्यता आहे. समुद्रात २०५० पर्यंत माशांपेक्षा जास्त प्लास्टिक असेल असे संशोधनातून समोर आले आहे. जगभरात केवळ १४ टक्के प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया केली जाते.

Leave a Comment