योग्य तापमान असलेल पाणी पिणे वजन घटविण्यासाठी सहायक


लठ्ठ व्यक्तींना आपले वजन कमी व्हावेसे वाटत असते, तर सडपातळ लोकांना आपले वजन कधीही वाढू नये असे वाटत असते. पण वजन वाढू न देता नियंत्रणात राहावे ह्याकरिता नुसता तसा विचार करणे पुरेसे नाही, तर त्यासाठी योग्य आणि संतुलित आहार आणि नियमित व्यायामाची आवश्यकता असते. ह्या दोन्ही अत्यावश्यक वस्तूच्या जोडीने काही लहानमोठ्या युक्ती उपयोगामध्ये आणल्यानेही वजन घटण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

शरीरातील पाण्याचे प्रमाण, किंवा हायड्रेशन वजन कमी करण्यासाठी अतिशय महत्वाचे ठरते. जर शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण आवश्यक ते असेल, तर शरीरातील घातक पदार्थ किंवा टॉक्झिन्स लघवी, किंवा घामावाटे सहजी बाहेर पडू शकतात. तसेच शरीरामध्ये पुरेसे पाणी असल्याने शरीराचे पचनतंत्रही व्यवस्थित राहते. हे देखील वजन करण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यामुळे भरपूर पाणी पिणे आवश्यक आहेच, पण त्याचबरोबर पाण्याचे सेवन करताना जर ते विशिष्ट तापमानावर असल्याची काळजी घेतली, तर वजन घटण्याचे काम आणखी जलद होते.

ह्या अनुषंगाने केल्या गेलेल्या रिसर्च मध्ये आढळून आले की, थंड किंवा ‘रूम टेम्परेचर’ वरील पाणी प्यायल्याने वजन जलद घटण्यास मदत होते. ह्या रिसर्चमध्ये चोवीस व्यक्तींना सहभागी केले गेले. ह्यामधील बारा व्यक्तींनी अर्धा लिटर थंड पाण्याचे सेवन केले, तर उर्वरित बारा लोकांनी रूम टेम्परेचेर वरील पाणी प्यायले. ह्या दोन्ही गटातील व्यक्तींनी पुढील दीड तासामध्ये आपली नियमित कामे करूनही नेहमीपेक्षा अधिक कॅलरीज खर्च केल्या. पण ज्या व्यक्तींनी थंड पाण्याचे सेवन केले होते, त्या व्यक्ती आराम करीत असताना किंवा निष्क्रिय असतानाही त्यांच्या शरीरातील कॅलरीज खर्च होत राहिल्या, कारण थंड पाणी गरम होण्यासाठी त्यांच्या शरीराने अतिरिक्त कॅलरीजचा वापर केला.

शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण योग्य असेल, तर वारंवार काही तरी खाण्याची इच्छा उद्भवत नाही. अनेकदा आपले शरीर, भूक आणि तहान ह्यामधील फरक न ओळखू शकल्याने तहान लागलेली असताना देखील आपण भूक लागली समजून काही ना काही खात असतो. त्यामुळे शरीराला आवश्यक नसलेल्या, अतिरिक्त कॅलरीज मिळतात. जर ह्या कॅलरीज खर्च झाल्या नाहीत, तर ह्याचे रुपांतर चरबीमध्ये होते. त्यामुळे भूक लागली असे जाणविताच काही खाण्यापूर्वी एक मोठा ग्लास भरून पाणी प्यावे, आणि त्यानंतर काही खाण्याची इच्छा असल्यास मगच खावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment