याच महिन्यात भारतात सुरू होऊ शकते ‘बिकिनी एअरलाइन्स’!


भारतात फ्लाइट्समध्ये या महिन्यापासून बिकिनी परिधान केलेल्या एअरहोस्टेस दिसतील. भारतात व्हिएतनामची ViertJet कंपनी त्याची अनोखी ‘बिकिनी एअरलाइन्स’ सुरू करत असून त्यांच्या फ्लाइट्स नवी दिल्ली ते Chi Minh City दरम्यान असतील. यात एअरहोस्टेसचा ड्रेसकोड बिकिनी असेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

आठवड्यातून चार दिवस या एअरलाइन्सच्या फ्लाइट्स उड्डाण करतील. सेक्स्टि मार्केटिंग पद्धतीसाठी ही एअरलाईन ओळखली जाते. ही एअरलाइन वुमन आंत्रप्रिन्योर Nguyen Thi Phuong Thao चालवते. त्यांचीच बिकिनी एअरलाइनची आयडियाही आहे.

कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर Luu Duc Khanh म्हणाले, एअरहोस्टेसचे ड्रेसकोड आम्ही नेहमी बदलत असतो. जे लोकांना परिधान करायचे असेल त्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आम्हाला सेक्स्टि मार्केटिंग म्हटले तरी हरकत नाही. आमची ‘बिकिनी इमेज’ तयार झाली तरीही चालेल. हा ड्रेस कोड्स पाहून आमचे प्रवासी आनंदी होतात यातच आम्हाला आनंद आहे.

२०११ मध्ये या एअरलाईनची सुरुवात कंपनीच्या प्रेसिडेंट आणि सीईओ Nguyen Thi Phuong Thao यांनी केली होती. ही कंपनी काही काळातच व्हिएतनामची दुसऱ्या क्रमांकाची एअरलाईन कंपनी बनल्यामुळे या कंपनीची ओनरही व्हिएतनामची पहिली महिला अब्जाधीश बनली. या एअरलाईनच्या २३ डोमेस्टीक आणि १० इंटरनॅशनल फ्लाइट्स आहेत. भारतात लोक या बिकिनी एअरलाइन्सला कसा प्रतिसाद देतात हेही आता लवकरच कळेल.

Leave a Comment