वरमाला घालताना नववधूने तिला उचलून घेणाऱ्याचा कान केला लाल; व्हिडीओ व्हायरल


मज्जा मस्ती आणि धम्माल असेच काहीसे समीकरण आपण लग्न सोहळ्या दरम्यान पाहतो. पण याच दरम्यान मस्तीची कुस्ती झाली तर चार लोकांसमोर वाद होतो. सध्या सोशल मिडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. वधू आणि वराला वरमाला घालताना उचलल्यानंतर दोघांनीही एकमेकांना वरमाला घातल्या पण वधूने त्यानंतर तिला उचलून घेतलेल्या व्यक्तीच्या कानाखाली गणपती काढला. सध्या फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअपवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

नवऱ्याकडील वऱ्हाड्यांनी वरमाला घालण्याच्या वेळी नवरदेवाला उचलून घेतले असे व्हिडिओत दिसत आहे. पण लाल रंगाच्या पेहरावत असणाऱ्या नवरी मुलीला कोणी उचलण्यास आले नाही. नवरदेवाला उचलून घेतल्याने त्याच्या गळ्यात वरमाळ घालणे मुलीला शक्य नव्हते. तेवढ्यातच तिच्या मागून आलेल्या एका व्यक्तीने तिला उचलून घेतले. दोघांनीही एकमेकांना वरमाला घातल्या. त्या व्यक्तीने त्यानंतर मुलीला खाली उतरवले. त्या नवरीने खाली उतरल्या उतरल्या मागे वळून त्या व्यक्तीला कानाखाली लगावली. नवऱ्या मुलाला स्टेजवर नक्की काय सुरु आहे हे समजण्याआधीच हा प्रकार घडला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्या मुलीने ज्या व्यक्तीवर हात उगरला ती व्यक्ती रागाच्याभरातच स्टेजवरून उतरून जाते. पण ती व्यक्ती जाता जाता नवरीच्या मागे उभ्या असणाऱ्या दुसऱ्या एका स्त्रीच्या कानाखाली मारताना दिसते.

पण त्याच्या कानाखाली का लगावली हे अद्याप गुलदस्त्यातच आहे आणि हा व्हिडीओ कोणत्या शहरातील आणि कधीचा आहे याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. पण हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी शेअर केला आहे.

Leave a Comment