पांढरे केस पुन्हा काळे करण्याकरिता वापरा चहा


केस पिकू लागणे, किंवा पांढरे होणे ही वृद्धत्वाचे लक्षण समजले जात असे. पण आजच्या काळामध्ये अगदी तरुणपणी देखील महिलांचे व पुरुषांचे केस पांढरे होताना दिसू लागले आहेत. फॅशन किंवा स्टायलिंगच्या नावावर केसांवर केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या रासायनिक प्रक्रिया, हेअर डाय, हेअर कलर, स्ट्रीक्स, हायलायटिंग ह्या करिता वापरली जाणारी अनेक उत्पादने, प्रदूषण, आहारामध्ये पोषणमूल्यांची कमतरता, मानसिक तणाव, अश्या प्रकारच्या अनेक कारणांनी केस अकाली पांढरे होताना दिसतात. मग त्यासाठी हेअर डाय, मेहंदी हा पर्याय निवडला जातो. मात्र ह्या पेक्षा अधिक सोपा आणि घरच्याघरी अवलंबता येणारा पर्याय म्हणजे चहा. हा पदार्थ आपल्यापैकी प्रत्येकाच्याच घरामध्ये हटकून असतोच. चहामध्ये असणारे टॅनीन केस काळे करण्यास सहायक आहे.

केस काळे करण्यासाठी चहा वापरायचा असेल, तर त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घेऊन ह्यामध्ये पाच ते सहा चमचे चहाची पूड घालावी. हा चहा वीस मिनिटे उकळू द्यावा आणि त्यानंतर गाळून घेऊन थंड करावा. मग ह्या चहाचे पाणी केसांना लावावे. ज्यांना केसांवर हलका ब्राऊन रंग हवा असेल, त्यांनी ह्या चहामध्ये थोडीशी कॉफी पावडर घालावी. चहाचे पाणी केवळ केस काळे करण्यासच सहायक नाही, तर ह्याच्या वापराने केस गळती कमी होते. तसेच केसांची वाढही चांगली होऊ लागते. चहाच्या पाण्याच्या वापराने केसांचा राठपणा दूर होऊन केस मुलायम, चमकदार दिसू लागतात. तसेच केसांचा कोरडेपणाही ह्यामुळे दूर होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment